उद्या पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते उद्या अंबाबाई मंदिरात स्वच्छता अभियान


उद्या कोल्हापुरात स्वच्छता राबविण्यात येणार आहे. हे अभियान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी अंबाबाई मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १९) दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता ते अतिग्रे येथे आयोजित प्राथमिक शिक्षण विभागाच्या महावाचन कार्यक्रमास उपस्थित राहतील. सोमवारी (दि. २२) रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी रेल्वेने ते मुंबईला रवाना होणार आहेत.