इचलकरंजीतील खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कचरा उठाव नाहीच, उद्योजकांकडून कचरा पेटविण्याचा प्रकार

सध्या आरोग्याच्या बाबतीत खूपच काळजी घेणे गरजेचे बनलेले आहे. अस्वच्छतामुळे आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू लागलेल्या आहेत. त्यामुळे जितकी स्वच्छता राखाल तेवढे आपले आरोग्य चांगले राहणार आहे. इचलकरंजी शहरातील शहापूर येथील खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट मधील कचरा मक्तेदाराकडून उचलला जात नसल्याने रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग साठले आहेत कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने उद्योजकाकडून कचरा जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने खंजिरे इंडस्ट्रीज इस्टेट मधील कचऱ्याचा उठाव चाचणीने करावा अशी मागणी उद्योजकातून होत आहे.

शहापूर येथील खंजिरी औद्योगिक वसाहतीमध्ये स्वयंचलित अत्याधुनिक असे यंत्रमागांची संख्या जास्त आहे. यंत्रमाग कारखान्यांमध्ये वातानुकूलित व्यवस्था बसवण्यात आलेली असते सदर वातावरण कोणी यंत्रणेमार्फत कारखान्यांमध्ये यंत्रमागाच्या खालच्या बाजूला जमा होणारा कापसाचा कचरा खेचून घेण्याची व्यवस्था बसवण्यात आलेली असते. सदर व्यवस्थेमधील साचलेला कापसाचा कचरा हा आठवड्याला बाहेर काढला जातो. सदरचा कचरा हा कारखान्याबाहेरील रस्त्यावर तसाच टाकला जातो.

शहापूर परिसरासह औद्योगिक वसाहतीसाठी साफसफाई व कचरा उठावासाठी महापालिकेच्या वतीने खाजगी मक्तेदार नेमला आहे. परंतु खाजगी मक्तेदाराकडून सदर विभागाची साफसफाई करणे अथवा कचरा उठावाचे काम होत नाही. परिणामी वजनाने हलका असलेला कापसाचा कचरा हा वाऱ्यामुळे इतरत्र उडत असतो त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र कापूस पसरलेला दिसतो या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचल्यास उद्योजकांकडून हा कापूस जाळण्याच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरलेले दिसतात त्यामुळे महापालिकेच्या सदर आरोग्य विभागाने यामध्ये
लक्ष घालून सदर मक्तेदारास कचरा उठाव करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात अशा अशी मागणी उद्योजकातून केली जात आहे.