हातकणंगलेत होणार उपजिल्हा रुग्णालय, आम. डॉ. अशोकराव माने यांच्या …..

सध्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक समस्या प्रश्न नागरिकांच्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे उपजिल्हा रुग्णालय होण्याचा मार्ग मोकळा झाला. हे रुग्णालय होणार आता पक्के झाले आहे. प्रस्ताव बनविण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीतून दिले.

यासाठी आम. डॉ. अशोकराव माने यांनी मोठा आग्रह धरला होता. त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय होत आहे, तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश ना. आबिटकर यांनी दिले. भादोले प्राथमिक आरोग्य केंद्र, टोप प्राथमिक आरोग्य केंद्र, किणी ट्रामा सेंटर, पट्टणकोडोली ग्रामीण रुग्णालय व वडगाव परिसरात रुग्णालय उभे करण्यावर मुंबईतील बैठकीत चर्चा झाली.

आम. डॉ. माने यांनी हातकणंगले विधानसभा मतदार संघातील आरोग्याची खरी परिस्थिती मांडली आणि गरजा तात्काळ पूर्ण व्हाव्यात असा आग्रह धरला. या सर्वांचे प्रस्ताव दुरुस्तीसह मंजुरीसाठी पाठवावेत, असे निर्देश झाले. यावेळी जिल्हा बँक संचालक विजयसिंह माने, किशोर जामदार, सुहास राजमाने व अन्य उपस्थित होते.