मनिषकुमार धूत यांचा सूत व कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. धूत यांना आवश्यक सूताचा पुरवठा करुन व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी धूत यांचा विश्वास संपादन केला. विश्वास संपादन करुन मागणीनुसार सूत पुरविण्याचे सांगत व्यापाऱ्याची १ कोटी २१ लाख ४४ हजार ३७० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील ७ सूत व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पंकज अग्रवाल व पियुश अग्रवाल यास अटक केली होती. मात्र, पियुश अग्रवाल याची प्रकृती खालावल्याने आयजीएम रुग्णालयात दाखल केले होते.
त्याची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिस तपासासाठी पुन्हा ताब्यात घेण्यात येणार असल्याचे समजते. तर गुन्हा दाखल झालेले मयूर अग्रवाल, दिशा अग्रवाल व प्रविण अग्रवाल यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला असून ७ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. गुन्ह्यातील संशयित प्रविण अग्रवाल याने व्हॅट टॅक्स न भरता ९४ लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी तसेच गोपीकिशन डागा यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारींचेही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. दरम्यान, फसवणूक प्रकरणातील रकमा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्यामध्ये रक्कम गुंतविली असल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे.