इचलकरंजी शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती शनिवारी भाजपाचे निवडणूक सहप्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी दिली आहे. इचलकरंजी शहर भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे, शहाजी भोसले, राजेश रजपुते, मिश्रीलाल जाजू, रवि गोंदकर, प्रताप पाटील, अरविंद शर्मा, अनिल डाळ्या, प्रसाद खोबरे, बाळकृष्ण तोतला, उमाकांत दाभोळे उपस्थित होते.