अलीकडच्या काळात नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेक नवनवीन आजार डोके वर काढताना दिसत आहेत. आपल्या आजारपणामध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक ज्या रुग्णालयात आपल्या स्वकीय रुग्णाच्या आजारपणात उपचार घेत असतात ते त्या रुग्णालयातील उपचार देणाऱ्या डॉक्टरांना एक प्रकारे जीव वाचवणारा देवदूतच समजत असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मोठा आदरभाव पाहायला मिळतो.
मात्र एका नामवंत समजल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे एक काळे वास्तव वेळीच जन तेसमोर येणे गरजेचे आहे काही वर्षांपूर्वी एक रुग्णालय उभे करत असताना काही डॉक्टरांनी एकत्र येऊन वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णालयांसाठी शासनाने घालून दिलेल्या इमारत बांधकामच्या नियमावलीला फाटा देत टोलेजंग इमारत बांधली व त्यानंतर यापुढे जाऊन आपआपल्या खाजगी ओ.पी.डी.च्या ठिकाणी किरकोळ आजाराचे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांना किरकोळ आजार असताना देखील वैद्यकीय सेवेचा मुखवटा घालून मेवा खाण्याच्या हेतूने उभारलेल्या त्या अनधिकृत टोलेजंग इमारतीमधील रुग्णालयात पुढील उपचार घेण्यासाठी पाठवण्यात येते.
रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी त्या रुग्णालयात जाण्यास नकार दिल्यास त्यांना आजारपणा बाबत भीती दाखवून पुढील उपचारासाठी वैद्यकीय सेवेच्या आड मेवा खाण्यासाठी उभारलेल्या त्या टोलेजंग रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडले जाते. तदनंतर सुरू होतो त्यांचा आज- ारपणाचा बाजार आर्थिक हव्यासापोटी काही डॉक्टरांनी एकत्र येऊन उभारलेल्या त्या टोलेजंग रुग्णालयात रुग्ण जे उपचार घेतात त्यांच्याकडून शासन नियमावलीला तिलांजली देत मोठ्या प्रमाणात बिलांची आकारणी केली जाते व त्यातून ज्या डॉक्टरांच्या ओ.पी.डी मधून संबंधित रुग्ण रेफर होऊन आला आहे त्यांना बिलातील टक्केवारी ठरलेली असल्याचे समजते.
त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या विश्वासाचा व आजाराचा बाजार करण्याचे काम संबंधित रुग्णालयात सुरू आहे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे संबंधित रुग्णालयातील अनुभव आलेल्या काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून बोलले जात आहे.
समविचारी ठराविक डॉक्टरांनी उभारलेल्या या टोलेजंग रुग्णालयात रुग्णांची आर्थिक पिळवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. तर या सर्व प्रकारा मुळे त्रस्त झालेल्या काही सामाजिक कार्यकत्यांनी उपोषण आंदोलनाचा पवित्रा घेतला असून या निर्ढावलेल्या टोळीला त्याचे काहीच फरक पडत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी या टोळी पैकी काहींनी पर्यटन स्थळी जाऊन मोठा पराक्रम केला होता त्या परक्रमाची संपूर्ण राज्यात खमंग अशी चर्चा सुरू होती तर अशा पराक्रमींचे विविध पराक्रम आम्ही जनतेसमोर लवकरच आणणार आहोत.