माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांचा ३ ऑगस्ट रोजी जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे १५ हजार ठेव ठेवण्याचा संकल्प

माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने (Anandabhau Mane) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा संकल्प केला आहे. समाजात मुलींचे प्रमाण वाढावे , मुलगी देखील मुलाप्रमाणे वंशाचा दिवा आहे. मुलीच्या जन्माने स्वागत व्हावे या उद्देशाने आपल्या ३ ऑगस्ट रोजी साजरा होत असलेल्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे १५ हजार रुपयाची ठेव ठेवण्याचा संकल्प केला आहे. गेल्या अनेक वर्षपासून वाढदिवसा दिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे ठेव ठेवण्याचा संकल्प आजही पुढे चालू ठेवला आहे. त्यांचा या कार्याचा आदर्श महत्वाचा मानला जात आहे . जन्मलेल्या मुलीच्या जन्मासंदर्भात डॉक्टरांचे सर्टिफिकेट , व आधारकार्ड सोबत आणावे . तसेच वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्गाचे संवर्धन व निसर्गावरचे प्रेम व्यक्त केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षपासून वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण करून त्या वृक्षांची जोपासना करण्याची काळजी ते घेत आहेत. वाढदिवसानिमित्त मुलींच्या नावे ठेव ठेवण्याचा केलेला. संकल्प व वृक्षरोपण कार्यक्रम हा वाढदिवसाचा आगळावेगळा उपक्रम असल्याचे राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष्य , माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदाभाऊ माने यांनी सांगितले आहे.