उद्या महाशिवरात्री उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या दिवशी मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. भाविकांची अलोट गर्दी मंदिरांमध्ये पहायला मिळते. इचलकरंजी येथील श्री पंचगंगातीर कैलासभूमी येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवार ता. २६ रोजी श्री पंचगंगेश्वर शिवमंदिरात रूद्राभिषेक पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पुजा माजी आम. प्रकाश आवाडे व समस्त विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी सर्व भाविकांच्या हस्ते दूध पाणी पुजा होणार असून रात्री श्री विठ्ठल भजनी मंडळ इचलकरंजी यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच आचार्य उदय गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली यामपुजा, महिन्य पुजा होणार आहे. तरी या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहून भगवान शंकराच्या पुजेचा लाभ घ्यावा तसेच ज्या भाविक भक्तांना अभिषेक पुजा करावयाची आहे त्यांनी हभप केशव पेटकर महाराज यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन समस्त विश्वस्त मंडळ पंचगंगेश्वर शिवमंदिर यांच्यावतीने करण्यात आले आहे.