इचलकरंजीत उद्या मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबिर

अथायु हॉस्पिटल व सरस्वती हॉस्पिटल यांच्या वतीने शुक्रवारी २ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबिर (binocular kidney and prostate surgery) आयोजिले आहे. यात मुतखडा लक्षणे, लघवीला अडथळा होणे, लघवीत रक्तस्त्राव होणे, लघवीला घाई होणे, किडणीचे कार्य मंद होणे, मुतखडा, पाठीकडून पोटात दुखणे, थेंब थेंब लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे. तसेच प्रोस्टेट लक्षणे लघवीची धार कमी होणे, लघवीची धार रोखता न येणे, रात्रीला लघवी वारंवार होणे, लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब लघवी होणे, लघवी करतांना त्रास वाटणे व संपूर्ण झाली नाही असे वाटणे, लघवी बंद होणे, अरुंद मूत्र मार्ग, लघवीतून रक्त जाणे किंवा लघवी लालसर होणे, लघवीला जोर करावा लागणे अशी लक्षणे असलेले रुग्ण शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात.

शिबिरास येताना सर्व जुने रिपोर्ट्स, आधारकार्ड व रेशनकार्ड घेऊन येण्याचे आहे. या शिबिरमधील पुढील उपचार २५ हजार हुन अधिक मूत्रविकार व प्रोस्टेट ऑपरेशनचे अनुभव असलेले मूत्रविकार तज्ञ डॉ. राहुल पाटील यांच्याकडून करण्यात येणार आहेत. असे सी.ई, ओ डॉ. बसवराज कडलगे यांनी सांगीतले.