प्रत्येक ठिकाणी अलीकडच्या या काळात गुन्हेगारीच्या प्रकारात खूपच वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना दिसून येत आहे. इचलकरंजीतील जुना चंदूर रोड बरगेमळा येथे तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पार्थ चंद्रकांत रामनकट्टी (वय १८, व्यवसाय – शिक्षण, रा. बरगेमळा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारीच्या रात्री ९.३० वाजता कार्तिक सनदी या मित्रासह लघुशंकेसाठी गेले असता, आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपी बाबु जामदार (पूर्ण नाव अज्ञात), किरण जगदाळे (रा. सिध्दीविनायक गल्ली, इचलकरंजी), योगेश सूर्यवंशी (रा. बरगेमळा, जुना चंदूर रोड), शुभम बेलेकर (रा. नदीवेस नाका) आणि १ अल्पवयीन यांनी मिळून फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर लोखंडी कड्याने आणि लाथाबुक्यांनी हल्ला केला.आरोपीना जुना चंदूर रोड परिसरात तपासासाठी फिरवण्यात आले.प्राथमिक तपासानुसार, आरोपी किरण जगदाळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक मुजावर प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
