Samsung च्या दोन स्मार्टफोन्सची 27 फेब्रुवारीला जोरदार एन्ट्री, ‘हे’ असतील खास फीचर्स

सॅमसंग कंपनीची Galaxy M Series, 27 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. या सिरीजमध्ये Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G हे दोन मॉडेल असणार आहेत. कंपनीने आधीच या दोन्ही स्मार्टफोनचा टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे. व्हिडिओ पाहून या फोनची काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, अमेझॉनवरही Galaxy M16 5G व Galaxy M06 5G या दोन्ही मॉडल्सची लाँच तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर तुम्ही सुद्धा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग त्यांचे दोन स्मार्टफोन लाँच करत आहेत. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळत आहेत तसेच या स्मार्टफोनची अपेक्षित किंमत काय असेल ते जाणून घेऊयात…

सॅमसंगची Galaxy M Series

अमेझॉनवर उपलब्ध असलेल्या या दोन्ही सॅमसंग स्मार्टफोनच्या बॅनरनुसार कंपनी 27 फेब्रुवारीला हे दोन्ही स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंगच्या एक्स पोस्टनुसार, तुम्हाला गॅलेक्सी M06 5G मध्ये एक उत्तम ड्युअल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. पण Galaxy M16 5G मध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसेल. दोन्ही स्मार्टफोन्सची डिझाइन खूपच चांगली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Samsung Galaxy M06 मध्ये हे फीचर्स उपलब्ध

Samsung Galaxy M06 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8GB पर्यंत रॅमचा पर्याय मिळू शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट असू शकतो. आगामी स्मार्टफोन Android 15 बेस्ड One UI 7 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यामध्ये तुम्हाला एक उत्तम कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्याद्वारे तुम्ही उत्तम फोटो-व्हिडिओग्राफी करू शकता. तसेच परफॉर्मन्सच्या बाबतीत सॅमसंगचे स्मार्टफोन चांगले असतात. तर लाँच करण्यात येणाऱ्या स्मार्टफोनकडूनही सर्वत्र अशीच अपेक्षा केली जात आहे.

Samsung Galaxy M16 5G

सॅमसंगचा Samsung Galaxy M16 5G हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेटने सुसज्ज असू शकतो. तसेच हा फोन Android 15 बेस्ड One UI 7 ऑपरेटिंग सिस्टमवर देखील काम करू शकतो.

सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची अपेक्षित किंमत

सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन तुमच्या बजेट किमतीत येऊ शकतात. हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. Samsung Galaxy M06 5G ची संभाव्य किंमत 10 हजार ते 11 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. त्याची बहुतेक वैशिष्ट्ये Galaxy F06 5G सारखीच असू शकतात.

जर आपण Galaxy M16 5G च्या किंमतीबद्दल बोललो तर त्याची किंमत थोडी जास्त असू शकते. हा स्मार्टफोन 15 हजार रुपयांपासून सुरुवातीच्या किमतीत येऊ शकतो. पण तरीही सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन बजेट फ्रेंडली असू शकतात.