सध्या अलीकडच्या काळात खून, मारामारी, अपघात या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. तसेच आत्महत्येचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. अशीच एक घटना इचलकरंजी शहरात घडली आहे. इचलकरंजी येथील वेताळ पेठ परिसरातील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली. तर पत्नीच्या मृत्यमुळे अस्वस्थ झालेल्या पतीने अंकली पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संपत शिकलगार असे त्यांचे नाव आहे.
या प्रकारामुळे सदर परिसरात एकच खळबळ उडाली होती. विषारी द्रव्य प्राशन केलेल्या राखी संपत शिकलगार (रा.वेताळपेठ परिसर) या विवाहितेचा गुरूवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेल्या पती संपत शिकलगार याने अंकली येथील कृष्णा नदीवरील पुलावरून नदीत उडी घेवून जीव देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद सांगली पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.