इचलकरंजीत प्रशांत कोरटकर विरोधात काँग्रेस आक्रमक, जोडे मारो आंदोलन

सध्या अनेक बाबतीत गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होतच आहे त्याचप्रमाणे अलीकडे अनेक अवमानकारक वक्त्यव्य देखील केले जातात. या वक्त्यव्यांचा विरोध आंदोलने अनेक भागात केली जातात. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देवून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल संतापजनक वक्त्यव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर या व्यक्तीविरोधात,या घटनेचा आज इचलकरंजी शहर काँग्रेसने गांधी पुतळा येथे आंदोलन करुन कोरटकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनाने प्रतिक्रिया दिली. यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करून राज्य शासनाने कोरटकरला ताबडतोब अटक करावी व त्यांचे पोलीस संरक्षण काढुन घ्यावे व अशा प्रवृत्तीला चाप बसवावा अशी मागणी केली.

यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, बाबासो कोतवाल,शशिकांत देसाई,युवराज शिंगाडे,रमजान शिकलगार,वेदिका कळंत्रे,विद्या भोपळे,अरविंद धरणगुत्तीकर,राजु किणेकर,प्रविण फगरे,किशोर जोशी,अनिल पचिंदे,शिवा चव्हाण,अल्ताफ पुजावर,पोपट शिंदे,अनिता बिडकर,सावित्री हजारे,अजित मिणेकर,सचिन साठे,विजय मुसळे,ओंकार आवळकर,तौसीफ लाटकर,गंगाधर माळी,मिलींद कुरणे,किरण कुरणे यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .