जनसन्मान महामेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते राहणार उपस्थित; दिपकआंबा साळुंखे पाटील

सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक नेते मंडळींची हालचाल सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उद्या 14 जुलैला रविवारी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान महामेळावा संपन्न होणार आहे आणि या महामेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बारामती येथील जनसन्मान महामेळाव्यासाठी नियोजन करण्यासाठी आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पंढरपूर आयोजित देखील केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआंबा साळुंखे पाटील यांनी दिली.

बारामती येथील जनसन्मान महामेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोलापूर जिल्ह्यातून उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआंबा साळुंखे पाटील यांनी दिली आहे.