अनेक भागात विविध कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. स्व. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त वैभव दादा शिंदे युवा मंच वतीने घोडा गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जनरल गट, खुल्ला नवतर गट अशा दोन गटात स्पर्धा झाल्या. जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, बाबासो सिध्द यांच्या हस्ते शर्यत सुरू करण्यात आली.
माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे, युवा नेते वरदराज शिंदे, विश्वराज शिंदे, अमर शेळके, सौरभ पाटील, रोहित मिरजकर प्रमुख उपस्थित होते. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास विश्वराज युथ फाऊंडेशन यांच्यातर्फे पाच हजार रुपये रोख रक्कम व ढाल देण्यात आली.
द्वितीय क्रमांक विजेत्यास सौरभ पाटील यांच्याकडून रोख तीन हजार रुपये ढाल देण्यात आली. तृतीय क्रमांक वैभव दादा शिंदे युवा मंच वतीने रोख रक्कम दोन हजार रुपये व ढाल देण्यात आली. उत्कर्ष माने, भीमराव माने, इंद्रजीत हिरुगडे, सुमित पाटील, निखिल पाटील उमेश कणसे प्रमोद यादव यांनी संयोजन केले होते.
