भारताचा हा स्टार क्रिकेटर दररोज खातो एक किलो मटण; म्हणाला त्याच्याशिवाय…, आहार पाहून डोकं चक्रावून जाईल

भारताचा स्टार फलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर होता, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. बांग्लादेशविरोधात झालेल्या सामन्यामध्ये त्याने पाच विकेट घेत जोरदार पुनरागमन केलं आहे. मात्र पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभा राहिल्यानं तो न्यूझीलंड विरोधातील सामना खेळणार का? याबाबत साशंकता आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये देखील शमीने भारतासाठी जोरदार कामगिरी केली होती.

दरम्यान मोहम्मद शमीचा डायट काय आहे? तो नेमकं काय खातो असा प्रश्न अनेकांना पडतो. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी मित्र उमेश कुमारसोबत बोलताना शमीनं आपल्या डायटबद्दल मोठा खुलासा केला होता. शुभांकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना उमेश कुमारने म्हटलं की, शमी सगळं काही सहन करू शकतो, मात्र तो मटणाशिवाय कधीच राहू शकत नाही. त्याला जर पहिल्या दिवशी मटण नाही मिळालं तर तो सहन करेल, दुसऱ्या दिवशी बेचैन होईल मात्र तिसऱ्या दिवशी त्याचं डोकं खराब होईल. तो मटणासाठी काहीही करू शकतो.

पुढे बोलताना उमेशने म्हटलं की, शमीला दररोज एक किलो मटण लागतं, जर त्याला एक किलो मटण मिळालं नाही तर त्यांच्या बॉलिंगची स्पीड ही सरसारी 15 किमी प्रति तासाने कमी होते. मोहम्मद शमीने वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझिलंड विरोधात खेळलेली इंनिग सर्वांच्याच लक्षात राहील. त्याने अवघे 57 धावा देऊन 7 विकेट घेतल्या होत्या, जेव्हा -जेव्हा तो गोलंदाजीसाठी उतरतो तेव्हा तेव्हा तो आपला बेस्ट परफॉम्स देण्याचा प्रयत्न करतो.