महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ गावातून धावणार Railway ; कसा असणार रूट?

सध्या भारतात रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक सुधारण्यावर सरकारकडून विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प सुद्धा सुरु केले जात आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग देखील सरकारकडून विकसित होत आहेत. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात लवकरच एक नवा रेल्वे मार्ग तयार झालेला दिसणार आहे. पंढरपूर ते लोणंद यादरम्यान हा नवा रेल्वे मार्ग तयार होणार असून याच प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी 14 गावातील जमिनीचे भूसंपादन केले जाणार असून या संबंधित गावातील तब्बल 807.10 एकर जमिनीचे अधिग्रहण होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथे रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीतच गृहमंत्री महोदयांनी या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या सूचना आणि आदेश दिलेत. यामुळे आता या रेल्वेमार्ग प्रकल्पाला एक नवीन दिशा आणि गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत असून लवकरच हा रेल्वे मार्ग आपल्याला प्रत्यक्षात तयार झालेला पाहायला मिळणार आहे.

खरे तर हा रेल्वे मार्ग 1925 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर हा मार्ग कागदावरच राहिला, यासाठी प्रत्यक्षात कोणत्याच हालचाली पाहायला मिळाल्या नाहीत. पण आता परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे आणि हा रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात साकार होईल असे चित्र तयार होत आहे. कारण की आता या मार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण सुरू होणार आहे. यासाठी तीन तज्ञ लोकांची समिती देखील स्थापित करण्यात आली आहे. ही समिती या रेल्वे मार्गावरील जमिनीची माहिती घेणार आहे. त्यानंतरच मग या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण सुरू होणार अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

इंग्रजांच्या काळातली Railway Line पूर्ण होणार

खरे तर पंढरपूर लोणंद रेल्वे मार्ग हा 1925 मध्ये म्हणजेच इंग्रजांच्या काळात प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु हा मार्ग इंग्रज काळात काही पूर्ण झाला नाही. पण त्यावेळी या मार्गासाठी जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या आणि त्यावर सीआर असे लिहिलेले दगड सुद्धा लावण्यात आले होते. मात्र त्या जागेचा सातबारा त्यावेळी तयार झालेला नव्हता. म्हणून आता या मार्गासाठीच्या जमिनीचे अधिग्रहण कसे होणार आणि यासाठी शेतकऱ्यांकडून काही विरोध केला जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे