हातकणंगले तालुक्यातील रुई येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

हातकणंगले तालुक्यातील रुई येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजाच्या वतीने महिला दिनानिमित्त फूड फेस्टिवल, ऑन द स्पॉट गेम व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीही दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता फूड फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे. सौ. सुवर्णा सुभाष बलवान यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन होईल. हा कार्यक्रम आचार्यरत्न श्री बाहुबली महाराज सांस्कृतिक भवन, मंगलधाम रुई येथे होणार आहे. 

सोमवारी ता. १० मार्च रोजी रात्री आठ वाजता दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी व्याख्यान आणि ऑन द स्पॉट गेमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या सौ. स्मिता निटवे या आहेत. या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन दिगंबर जैन समाज रुईचे अध्यक्ष अजित खुळ, वीर महिला मंडळाच्या संघनायिका सौ. रोहिणी खुळ, उपसंघनायिका सौ. सुनीता चौगुले, वीर सेवा दलचे संघनायक हेमंत चेंडके व उपसंघनायक प्रमोद सरडे यांनी केले आहे.