भारतीय जनता पार्टीने हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीपर्यंत या मतदारसंघात त्यांना कार्यरत राहायचे आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 11 लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा केली आहे.
खा. अनिल बोंडे यांना हातकणंगले लोकसभा निवडणुक निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार ते हातकणंगलेसाठी रवाना झाले आहे. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातले मतदान होणार आहे. तोपर्यंत खा. अनिल बोंडे तेथे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहे. पक्षाने त्यांच्यावर आजपर्यंत अनेक जबाबदारी दिल्या. त्या त्यांनी यशस्वीपणे पार पडल्या आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन पक्षाने ही जबाबदारी त्यांना दिली आहे.Anil Bonde त्यांच्या नियुक्तीचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.