पट्टणकोडोलीत रयत क्रांतीला खिंडार; विजय मोरे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

हातकणंगले तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन, शिंदे शिवसेनेला उभारी 5 देण्यासाठी अनेक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करत आहेत. पट्टणकोडोलीतील सदाभाऊ खोत यांचे निकटवर्ती आणि हातकणंगले तालुका अध्यक्ष विजय मोरे यांनी रयत क्रांतीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची निवासस्थानी भेट घेऊन कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी मुरलीधर जाधव यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज देऊन त्यांचे स्वागत केले. इथून पुढे शिवसेना पक्ष वाढीसाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार असल्याचे मोरे यांनी नमूद केले. यावेळी युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी, विठ्ठल रामांना, सतीश हुपरे, राजेंद्र पाटील, सचिन हुपरे, दशरथ तोडकर, कुमार डुम, विनायक तोडकर, अमोल केरू आदी उपस्थित होते.