हुपरी येथे मस्साजोगचे सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आरोपी वाल्मिक कराड यांला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार यांनी केली. तर युवासेनेचे शिवाजी जाधव यांनी कराडच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करीत प्रतिकात्मक फाशी देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी काही काळ तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसैनिकांनी देशमुख हत्या प्रकरणांतील क्रूर व निच मानसिकतेच्या विरोधात आक्रमक होत घोषणाबाजी करीत तिव्र शब्दात निषेध केला. व यातील आरोपींना जर कोणी पाठीशी घालत असेल तर अशा वाईट प्रवृत्तींना आळा बसेल अशी कठोर कारवाई करावी.अन्यथा युवा सेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा शिवाजी जाधव यांनी दिला.
अजित सुतार यांनी गुंडांचा म्होरक्या वाल्मिक कराडने गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती जप्त करण्याची मागणी केली. यावेळी एकाच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आंदोलन आयोजित करण्यावरुन व निवेदनातून नावे वगळल्याने अंतर्गत धुसफूस ऐकायला मिळाली. मात्र, जुना दोस्तांना जागा झाल्याने हा विषय बाजूला सारून आंदोलन यशस्वी करण्यात आले. मात्र, हे आंदोलन करण्यात विलंब झाल्याचे लोक उघडपणे बोलत होते. यावेळी संभाजी हांडे, राजेंद्र पाटील, दशरथ तोडकर, अजित उगळे, पवन घाडगे, किरण भिवटे, श्रावण मयेकर, संदिप सिद्धनोर्ले, संदीप आपटे, श्रीहरी पेटकर, सुनील गुदले, प्रविण चव्हाण, भरत देसाई, सागर मेथे, सागर लोहार, निखिल शेटके, तानाजी शिंदे, अमर माने, नितीन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.