भारताने चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा चार विकेटने पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भारत एकही सामन्यात पराभूत झाला नाही. अंतिम सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा हिरो ठरला. त्याने 83 चेंडूंत 76 धावा केल्या. त्यालाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला. रोहित शर्मा फक्त मैदानातच नाही तर उत्पन्नाच्या बाबतीतही आघाडीवर आहे. त्याची नेटवर्थ आहे तरी किती?
214 कोटी संपत्तीचा मालक हिटमॅन
रोहित शर्मा भारती क्रिकेट नियामक मंडळाच्या A+ ग्रेडचा खेळाडू आहे. तो भारतीय संघाचा कर्णधारदेखील आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून वर्षाला सात कोटी रुपये मानधन मिळते. तसेच एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवशी सामन्यासाठी 6 लाख आणि T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. रोहित शर्मा याला IPL मधून 16 कोटी रुपये मिळतात. क्रिकेटमधून मिळणारे उत्पन्न हे रोहित शर्माच्या कामाईचा मोठा भाग आहे.
रिपोर्ट्सनुसार त्याची संपत्ती 214 कोटी रुपये आहे. फक्त क्रिकेटमधून रोहितला 23 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये जाते. तसेच इतर ब्रॅडच्या जाहिरातीचे उत्पन्न मिळवल्यावर ही कमाई त्यापेक्षा जास्त आहे.
रोहित शर्माचा अनेक ब्रँडसोबत करार
रोहित शर्मा क्रिकेटबरोबर इतर कंपन्यांच्या जाहिरातीमधून उत्पन्न मिळवतो. तो अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कंपन्यांचा ब्रँड अंबेसेडर आहे. त्यात CEAT, Rasna, Oral-B, Swiggy, Ixigo, Max Life Insurance, New Era, Aristocrat आणि IIFL यासारख्या कंपन्या आहेत.
रोहित शर्मा गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळवत आहे. त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक जवळजवळ 90 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याच्या इन्वेस्टमेंट पोर्टफोलियोमध्ये Rapidobotics, Veiroots Wellness Solutions यासारखे स्टार्टअप आहे. तसेच तो मुंबईत एक क्रिकेट एकेडमी CricKingdom चालवतो. त्याने मुंबईत फ्लॅट घेऊन ते भाड्याने दिले आहे. त्यातूनही त्याला लाखोंचे उत्पन्न मिळते.