येथील वावटुळ ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी! करण्यात आली. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने बसस्थानक चौक दणाणला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख अभिजीत पाटील यांच्या हस्ते मशालीचे पूजन झाले. राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे माजी चेअरमन पी. आर. पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीपराव वग्यानी, राजारामबापू साखर कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे, डॉ. जितेंद्र साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन पुष्पहार घालण्यात आला. यावेळी वावटुळ ग्रुपचे संस्थापक। राजू माने, आष्टा शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले, रामचंद्र सिद्ध, माणिक शेळके, पैलवान पांडुरंग ढोले, बाबासाहेब सिद्ध, प्रभाकर जाधव, सतीश माळी, सोमाजी डोंबाळे, सागर माने, मंगेश माने, दीपक ढोले, अमोल ढोले, राहुल वाडकर, प्रकाश सिद्ध, धनाजी ढोले, सागर सिद्ध, संतोष माने आदी प्रमुख उपस्थित होते.
आष्टा शहरात शिवजयंती साजरी
