महाराष्ट्रात सर्वात मोठी भरती प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. कारण (create) जवळसपास राज्यातील ३४ जिल्हा परिषदेत १९ हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे. ‘गट क’ मधील ही पदे असून त्यासाठी अर्ज कसा करावा आणि सर्व तपशील जाणून घेऊया…
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि सरकारी नोकरी हवी असेल तर एक मोठी सुवर्णसंधी (create) तुमच्यापुढे चालून आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा परिषदांमध्ये मोठी भरती सुरु आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल १९ हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये ‘क’ गटातील पदे असून तुम्हाला तुमच्याच जिल्ह्यामध्ये काम करण्याची ही उत्तम संधी आहे.
ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट‘क’मधील सरळसेवेची तब्बल १९ हजार ४६० पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत आरोग्य विभागातील १०० टक्के आणि इतर विभागांतील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांसाठी ही भरती होणार असून ५ ते २५ ऑगस्टदरम्यान उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील.
या पदांसाठी होणार भरती
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिगमन, लघुलेखक (उच्चश्रेणी), वरिष्ठ सहायक (लिपिक), वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पर्यवेक्षिका आणि यासह अन्य काही पदांचा समावेश आहे.
कसा करावा अर्ज
जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे तर २५ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची शेवटचीतारीख असेल.
त्या-त्या पदासाठीची पात्रता वेगळी असून त्याचे तपशील संकेतस्थळावर नमूद केले आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यासाठी खुल्या वर्गाकडून १००० रुपये तर आरक्षित वर्गाकडून ९०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे
City Varta:-