‘या’ अभिनेत्रीचं फेसबुक अकाऊंट वरुन अश्लील व्हिडीओ व्हायरल

मराठमोळी अभिनत्री आणि नुकतंच रॉकी और रानी की प्रेम कहानी या बॉलिवूड सिनेमात (bollywoodmovie) झळकलेली क्षिती जोगच्या आयुष्यात धक्कादायक गोष्ट घडली आहे. क्षिती जोगचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आलीय. क्षिती जोगचा नवरा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमेने ही माहिती सोशल मिडीयावर शेअर केलीय.

हेमंत ढोमेने शेअर केली पोस्ट

“चलचित्र मंडळीच्या निर्माती, अभिनेत्री क्षिती जोग (bollywoodmovie) यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. पेजवरून काही अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. फॉलोवर्सना विनंती आहे की, अशा पोस्टकडे आपण दुर्लक्ष करावे. आम्ही पेज सुरळीत होण्यासाठी कार्यरत आहोत. तरी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी संयम ठेवावा ही विनंती. आपल्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर.

  • चलचित्र मंडळी”

अशी पोस्ट करत हेमंत ढोमेने ही माहिती शेअर केलीय.

क्षिती जोग बॉलिवूडमध्ये चमकली

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने या चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. चित्रपटातील नामवंत चेहऱ्यांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, म्हणजेच क्षिती जोगचा.

सध्याच्या आघाडीच्या दोन पिढ्यांच्या नटांसोबत क्षिती चमकली

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याबद्दल क्षिती जोग म्हणते, ” यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केले आहे आणि ते काम मी एन्जॉयही केले आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण आहे. या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेची इतकी दखल घेतली जात आहे, हे माझ्यासाठी खूप सुखावणारे आहे. मला या चित्रपटात दोन वेगळ्या पिढीतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. आपण केलेल्या कामाचे दिग्गजांकडून, चाहत्यांकडून कौतुक होणे, हे एका कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मौल्यवान असते. एका कलाकाराला आणखी काय हवे असते. या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. खूप शिकता आले. एकंदरच हा अनुभव माझ्यासाठी कमाल होता.”

City Varta:-

सुळकुड पाणी योजनेबाबत २३ ऑगष्टला मोर्चा