अनेकांना देशसेवा करण्याची इच्छा असते. यासाठी नौदल, आर्मीमध्ये नोकरीच्या संधीची वाट पाहत असतात. सध्या भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने कार्यकारी आणि टेक्निकल विभागात भरती जाहीर केली आहे. B.Tech Entry July 2025 Batch साठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
अर्जप्रक्रिया ६ डिसेंबरपासून सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२४ आहे.
अधिकृत वेबसाइट
या नोकरीसाठी अर्ज तुम्ही www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
भारतीय नौदलातील ही भरती १०-२ इंटर बीटेक एंट्रीअंतर्गत होणार आहे. म्हणजे १०वी आणि बारावीनंतर बीटेक केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी आणि १२वी परीक्षा पास केलेली असावी.
याचसोबत फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयात ७० पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावे. याचसोबत त्यांनी JEEMAIN 2024 परीक्षा पास केलेली असावी.
इंडियन नेव्हीतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ जानेवारी ते १ जुलै २००८ च्या मध्ये झाला असावा. याचसोबत उमेदवाराची उंची १५७ सेमी असावी. उमेदवारांची निवड जेईई मेन या परीक्षेत मिळालेल्या रँकच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क भरायचे नाही. या नोकरीसाठी तुम्ही भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
