हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी धुम धडाक्यात साजरा केला जाते. आता काही दिवसामध्ये होळी येणार आहे. भारतभरामध्ये होळीच्या दिवशी पूजा आणि रंगपमीच्या दिवशी रंग खेळले जातात. होळीला रंगाचा उत्सव मानला जातो. होळीच्या दिवशी तुमच्या घरच्यांसोबत आनंदात रंग खेळले जातात. होळीच्या दिवशी लेकं एकमेकांना रंग लावतात. होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंग पंचमीच्या एक दिवस आधि होलीका दहन केले जाते. होळीच्या दिवशी किंवा त्याच्या दोन ते तीन दिवस कोणत्याही प्रकारचे चांगले काम किंवा शुभ कार्य करू नये अशी मान्यता आहे. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात.
पौराणिक कथेनुसार, होलिका एक राक्षसी होती. ती राक्षस राजा हिरण्यक्षयची बहीण होती. प्रल्हादाला मारता यावे म्हणून हिरण्यकश्यपूने तिला प्रल्हादासोबत अग्नीत बसण्याची आज्ञा दिली होती, परंतु होलिका स्वतः आगीत जळून राख झाली. ज्या दिवशी होलिका अग्निमध्ये जाळली गेली तो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता. म्हणूनच, तेव्हापासून फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू आहे.
होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी होलिका दहन करण्यासोबतच तिची पूजा आणि प्रदक्षिणा देखील केली जाते. या दिवशी दान देखील केले जाते. या दिवशी दान केल्याने जीवनात समस्या येत नाहीत. अशा परिस्थितीत, या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात ते जाणून घेऊया. हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तारीख 13 मार्च रोजी सकाळी 10:35 वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, होलिका दहन मार्चमध्ये केले जाईल. या दिवशी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:26 ते 12:30 पर्यंत असेल. या दिवशी होलिका दहनासाठी 1 तास 4 मिनिटांचा वेळ असेल. दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाईल.
होलिका दहनाच्या दिवशी ‘या’ गोष्टी दान करा
- होलिका दहनाच्या दिवशी गरीब आणि गरजूंना कपडे दान करावेत.
- होलिका दहनाच्या दिवशी गहू, हरभरा, बार्ली किंवा तांदूळ दान करावे.
- होलिका दहनाच्या दिवशी शुद्ध देशी तूप दान करावे.
- होलिका दहनाच्या दिवशी गूळ आणि हरभरा दान करावा.
- होलिका दहनाच्या दिवशी नारळ दान करावा.
- होलिका दहनाच्या दिवशी भांडी दान करावीत.