हुपरीतील बांधकाम विभागाचे काम दर्जाहिन; अभियंत्याचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात

हुपरी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाची विघडलेली स्थिती आणि दर्जात्मक कामापेक्षा स्वहित जपणाऱ्या अभियंत्यांचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सोशल मीडियावर टक्केवारीची घागर घुमत आहे. यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती नेमून या गंभीर विषयाची चौकशी करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.नगरपरिषद कामकाज सुरू झाल्यानंतर प्रत्येक विभागातील कुशल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडला पण नजरेत भरण्यासारखे एकही काम आजपर्यंत झाले नाही. परंतु लक्षात रहाण्यासारखे काम मात्र सुरू आहे. एका गोठ्यात्त टेंडर प्रक्रियेतील दूधावरकाढलेल्या कमिशनच्या मलईचे वाटप झाले आहे. हे सांगताना स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग, चांधकाम विभागाच्या गुप्त कारभाराची आवर्जुन आठवण होते.

स्वच्छतेचा ठेका देऊन पद्धतशीरपणे लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे अजय गजब कामकाज केले आहे. यातून टक्केवारीची लगबग आणि फाळकूट दादांच्या असंख्य करामती आणि लुडबूड पहावला मिळाली आहे. चार आण्याच्या कोषडीला बारा आण्याचा मसाला आणला जात आहे. यातील गुपित्त सुज्ञ नागरिकांना माहित आहे. अधिकारी हुपरी शहरात रिकाम्या हाताने येतात आणि जाताना गडगंज ऐश्वर्याला मिठीत घेऊन जातात हे वास्तव आहे. याचा हळूहळू विस्तव होत आहे. याची दखल आता मुख्याधिकारी अजय नरळे यांनी घ्यावी लागेल! अशी अपेक्षा गोरगरीच जनता करीत आहे.