संजीवनी हॉस्पिटल बावची व संजीवनी वुमन्स हेल्थकेअर आष्टा यांच्यावतीने बावची व आष्टा परिसरातील महिला रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर झाले. एकशे वीस महिलांनी मोफत आरोग्य तपासणी केली.आष्टा येथील संजीवनी वुमन्स हेल्थकेअर च्या मुख्य स्त्रीरोग व वंद्यत्व चिकित्सा तज्ञ डॉ. मंजुश्री कोळी व प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. योगेश जाधव यांनी सदर शिबिरामध्ये महिला रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार केले.
संजीवनी वूमेन्स हेल्थ केअर आष्टा या रुग्णालयाने, अल्पावधितच हजारो दाम्पत्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करून, पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केल्या बद्दल हॉस्पिटल च्या डॉ सौ मंजूश्री कोळी व डॉ योगेश जाधव यांचासदर शिबिराचे आयोजन आष्टा डाक्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व संजीवनी हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ. प्रविण कोळी यांनी केले.
