सांगोला येथे जमिनीच्या वादातून महिलेच्या मृत्यूप्रकरणी एकास जन्मठेप 

सांगोला येथे जमिनीच्या वादातून सैन्यात नोकरी करणाऱ्या जवानाने गोळीबार करुन महिलेच्या मृत्यूप्रकरणी जवानास जन्मठेपेची व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी सुनावली. ही घटना १९ जुलै २०१४ रोजी सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे घडली होती. यामध्ये लष्करी जवान बिरू पांढरे याने गोळीबार केला होता. यामध्ये उज्वला पांढरे यांना गोळी लागून जागीच मृत्यू झाला होता. उदनवाडी येथील दत्तात्रय पांढरे यांच्या जमीन गट नंबर ६८ मध्ये १९ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आरोपीने लोक जमवून ही जमीन तुम्ही खरेदी का केली, या जमीनीला आम्ही कुळ आहे.

या कारणावरून आरोपी बिरू पांढरे व इतर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून बिरू याने त्यांच्याकडील बंदुकीमधून गोळीबार करून उज्वला पांढरे यांचा जीव घेतले. इतर आरोपी काकासाहेब पांढरे, विष्णू पांढरे, भगवान पांढरे, नामदेव पांढरे, पांडुरंग धायगुडे यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादी दत्तात्रय पांढरे व साक्षीदार अर्जुन पांढरे, जयवंत पांढरे, कुसूम पांढरे, सुमन पांढरे यांना ठार मारण्याच्या उददेशाने मारहाण करून जखमी केले व इतर आरोपी कमलाबाई पांढरे, मालन पांढरे, पूजा पांढरे, छाया पांढरे, इंदू पांढरे यांनी आरोपीना चिथावणी देऊन दगडफेक केली.

आरोपी बिरू पांढरे याने घटनेमध्ये स्वत:च्या बंदूकीची गोळी झाडली. त्यामध्ये उज्वला पांढरे हिला गोळी लागून ती जागीच मृत झाली होती. याबाबत दत्तात्रय पांढरे यांनी आरोपी बरू मानेसह इतर आरोपीविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.