सांगोला येथे 15 ते 20 मार्च दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सांगोला येथील वासुद रोड दत्तनगर जवळ असणाऱ्या असणाऱ्या केदार हॉस्पिटल येथे हा शिबिर पंधरवडा आयोजन केलेला आहे.
15 ते 30 मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे. वेगवेगळ्या तपासण्या या शिबिरामध्ये करण्यात येणार आहेत. तसेच विविध आजारांवरती मोफत निदान देखील तज्ञ डॉक्टरांकडून केले जाणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व गोरगरीब गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिर पंधरवड्याचा लाभ अवश्य घ्यायचा आहे.