महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. त्यातच बलात्कार, हत्या, खून, अपहरण या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. आता बुलढाणा जिल्ह्यात रक्ताच्या नात्याला काळीमा लावणारी घटना उघडकीस आली आहे. एका नराधम बापानेचे आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तब्बल दीड वर्षांनी डी.एन.एच्या रिपोर्टमुळे ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बुलढाणा जिल्ह्यात सख्ख्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दीड वर्षांपूर्वी शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली होती. अज्ञात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीवर अत्याचार कुणी केला? याची काहीच उकल होत नव्हती.
आता या प्रकरणी पोलिसांच्या हाती तब्बल दीड वर्षांनी मोठी अपडेट समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीला 28 आठवड्यांची गर्भवती करणाऱ्या मुलीवर दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्या सख्या बापाने अत्याचार केल्याचे डीएनए रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
आरोपी मागील अनेक महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत असल्याचं डीएनए रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे त्या मुलीच्या पोटात वाढणारं बाळ आरोपी बापाचेच असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी जलंब पोलीस तातडीची पावलं उचलत नराधम आरोपी बापाला अटक केली आहे. त्या धक्कादायक प्रकाराने समाजमन सुन्न झाला आहे.
घटना कशी उघड झाली?
दीड वर्षांपूर्वी जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडली होती. तिच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीवर अत्याचार कोणी केला, याचा तपास सुरु झाला. यानंतर याप्रकरणी डीएनए चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती उघड झाली.