जगातील सर्वात उंच मुर्ती थायलंडच्या चाचोएंगसाओ प्रांतात आहे. ही 39 मीटर (128 फूट) उंच कांस्य मूर्ती ख्लोंग खुआन गणेश आंतरराष्ट्रीय उद्यानात बांग पाकोंग नदीकाठी उभी आहे. 2012 मध्ये चार वर्षांत बांधकाम पूर्ण झालेली ही मूर्ती दूरवरून लक्ष वेधते आणि थाई संस्कृतीचे आध्यात्मिक प्रतीक आहे. पिटक चालुमलाव यांनी डिझाइन केलेली ही मूर्ती 854 वेगवेगळ्या वस्तूंनी बनली आहे. गणेशाच्या चार हातात ऊस, फणस, केळी आणि आंबा आहे, जे समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक मानले जाते. मुर्तीचा वरचा पाय राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक आहे, तर मुकुटावरील कमळ ज्ञानाचे आणि “ओम” चिन्ह गणेशाच्या देवत्वाचे प्रतीक आहे.
थायलंडमध्ये गणेशाला (Ganesha) यश, ज्ञान आणि संरक्षणाचा देवता मानले जाते. लोक घरे, कार्यालये आणि विद्यापीठांमध्ये गणेश मूर्ती ठेवतात. दरवर्षी गणेशाच्या सन्मानार्थ विशेष उत्सव आणि विधी होतात, जे थाई संस्कृतीत गणेशाचे महत्वपूर्ण स्थान दर्शवतात. ही मूर्ती थायलंडच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे.
भारतात गणेशाची हजारो मंदिरे आणि भव्य मूर्ती आहेत. असे असूनही सर्वात उंच मूर्ती थायलंडमध्येच आहे. भारतात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी होते. असे असताना थायलंडमधील ही मूर्ती जागतिक स्तरावर भक्त आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. 39 मीटर उंचीची ही मूर्ती धार्मिक स्थळासह थायलंडच्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. ती गणेश भक्तांना प्रेरणा देते आणि हिंदू धर्माच्या जागतिक प्रभावाचे दर्शन घडवते. पर्यटक आणि भक्तांसाठी हे एक प्रमुख आकर्षण आहे.
