हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे घरी कोणी नसल्याचा गैर फायदा घेत चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे सतरा वर्षीय अल्पवयीन चुलत भावाने लैंगिक शोषण केले. याप्रकरणी बाल लैंगिक कायद्या अंतर्गत गुन्हा संबंधिता विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, संबंधीत अल्पवयीन मुलगी एकटीच घरी असल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन चुलत भावाने तिच्या घरात प्रवेश केला व तिच्याशी नोव्हेंबर २०२४ मध्ये लैंगिक आत्याचार केला.
यानंतर १९ मार्च २०२५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिढीतीचे आई वडील कामावर गेल्याचे पाहुन तिच्या घरात जाऊन ती एकटी असल्याचा गैर फायदा घेत त्याने तिचा हात पिरंगळून पुन्हा तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या विरोधात शुक्रवारी हातकणंगले पोलीसांत पिढीतेने दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.