छत्रपती शाहू इंडस्ट्रियल इस्टेटच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव राहणार प्रयत्नशील ; आम. डॉ. अशोकराव माने

विधानसभा निवडणुकीत डॉ. अशोकराव माने हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यांची आमदार पदी निवड झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या समस्या, अनेक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शाहू को. ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट मधील उद्योजक तसेच संचालक यांच्या वतीने आमदार डॉ. अशोकराव माने यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी यावेळी आगर फाटा ते रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी हॉलपर्यंत ओपन जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. तसेच जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. अशोकराव माने म्हणाले की, माझ्या विजयामध्ये सर्व उद्योजकांनी आपल्या संपर्कातील प्रत्येकाशी संवाद साधून मला प्रचंड मताधिक्याने विजयी केले. छत्रपती शाहू इंडस्ट्रियल इस्टेटच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.