मुडशींगीच्या विकासासाठी भरघोस निधी देणार : आ. डॉ. अशोकराव माने

मुडशींगी गावातील विकासकामांसाठी आमदार निधीतून भरघोस निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन नुतन आमदार अशोकराव माने यांनी केले. मुडशींगी येथे पर्यटन विकास निधी व अल्पसंख्यांक विकास निधी मधून रस्ता कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कामासाठी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष सहकार्य करुन ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कार्यक्रमास जयसिंगपूर माजी नगराध्यक्षा नीता माने, सुहास राजमाने, सरपंच गजानन जाधव, ग्रामपंचायत सदस्य ललिता अनुसे, शिवाजी भोसले, विश्वनाथ कांबळे, फातिमा पेंढारी, नंदा कांबळे, अजहर पेंढारी, नंदा पाटील, विनायक इंगवले, पल्लवी शिंगाडे, अमोल अनुसे ग्रामसेवक – खाबडे यांच्यासह कार्यकर्ते म ोठ्या संख्येने उपस्थित होते.