हुपरीकडून इंगळीकडे जाणारा रस्ता हा नागरिकांसाठी जवळचा मार्ग आहे. या रस्त्यावर अनेक वेळा डांबरीकरण करण्यात आले आहे. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांची दुरवस्था पाहून खातरजमा करावी असे वाटले नाही. याबाबत कसलीच शंका वाटली नाही याचे आश्चर्य वाटत असून सांडपाण्याचा निचरा या विहिरीत करण्यात आला आहे. अचानक हा संपूर्ण रस्ता खचला आहे. डोळ्यांसमोर आठ ते दहा दुकान टपऱ्या व आतील साहित्य भूस्खलनात गडप झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होते मात्र घटना घडण्यापूर्वी लक्ष का देत नाही हा मुद्दा आहे.
या ठिकाणी रस्त्यावर सोडलेले व पाईप फुटून सातत्याने सांडपाणी जमिनीत मुरत राहिल्याने आज रस्ताच ढासळत गेला आहे. दुकान गाळे वाहून गेले मात्र नशिबाने कुठल्याही प्रकारची दुदैवी घटना घडली नाही हे विशेष आहे. हुपरी कडे वाहतुकीसाठी आता पर्यायी मार्गच बंद झाला आहे. घटनास्थळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, बीडीओ शबाना मोकाशी, सर्कल जानकी मिराशी, सार्वजनिक बांधकाम उप. अभियंता एस. एस. पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अमित पाटील, शुभम गुरव, पीआय निंगापा चौखंडे, सरपंच दादासाहेब मोरे, उपसरपंच सुरज बुकटे यांनी भेट देऊन पाहणी केली.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख केशव पाटील यांनी उंबरठ्यावर गावची यात्रा येऊन ठेपली आहे. पंधरा दिवसांत पर्यायी मार्गाची व्यवस्था करा अन्यथा आमरण उपोषणासह आंदोलनाचा इशारा दिला.