लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाल्याने देशात एनडीएची सत्ता पुन्हा आल्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Hatkanangale MP Dhairyasheel Mane) यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली आहे.
महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. खास. धैर्यशील माने यांना केंद्रात संधी मिळाल्यास त्याचा निश्चित लाभ हा मतदारसंघास होणार असल्याचे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
लोकसभा निकालात पश्चिम महाराष्ट्रात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा धुव्वा उडाला. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक हेही पराभूत झाले. शिंदे गटाला राज्यात केवळ सात जागांवर विजय मिळवता आला. त्यात शिंदे यांचे पुत्र श्रीकांत, ठाण्यात नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, संदीपान भुमरे, हातकणंगलेतून धैर्यशील माने, मावळमध्ये श्रीरंग बारणे व बुलाढाण्यातून प्रताप जाधव विजयी झाले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान द्यायचे झाल्यास शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत, अनुभवी श्री. वायकर, दुसऱ्यांदा विजयी झालेले बारणे यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो; पण पश्चिम महाराष्ट्रात पक्षवाढीचा विचार डोळ्यापुढे ठेवून मंत्रिपद द्यायचे झाल्यास माने हे एकमेव उमेदवार आहेत. त्यात शिंदे यांनी त्यांच्यासाठी मोठ्या जोडण्या मतदारसंघात लावल्या होत्या. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशीही त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. स्वतः शिंदे मुख्यमंत्री असल्याने पुन्हा मुलाला केंद्रात मंत्रिपद मिळेल का याची शाश्वती नाही. त्यातून माने यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ