सांगोला एसटी आगारास जुलै अखेरपर्यंत मिळणार २० एसटी बसेस

सांगोला एसटी आगारामध्ये सध्या ५२ एसटी बसेस असून त्यातील १० बसेस नजीकच्या काळात स्क्रॅपला जाणार असल्याने ४३ बसेसवर आगाराचा कारभार चालविणे अशक्य होणार आहे. अश्या परिस्थितीत बस स्थानकातील डांबरीकरण खराब झाल्याने त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे या मागण्या घेऊन सांगोला तालुक्याचे माजी आम. अॅड. शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री नाम. प्रतापजी सरनाईक यांची भेट घेतली. या मागणीचा विचार करून परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी सांगोला एसटी आगारास जुलै अखेरपर्यंत नवीन २० एसटी बसेस देण्याचा शब्द दिला आहे.

त्यामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांची सोय होणार आहे. सांगोला एसटी आगाराचे उत्पन्न ही वाढणार आहे. अशी माहिती माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. सांगोला एसटी आगारातीळ १० बसेस स्क्रॅपला जाणार असल्याने शिल्लक ४३ बसेस एसटी आगारात अपूर्ण पडत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवासी सेवेचा विचार करता ज्यादा बसेसची आवश्यकता व गरज भासत होती. त्या संदर्भात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे २० नवीन एसटी बसेस देण्यासंदर्भात मागणी केली होती.