सांगोला येथे संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांचे अध्यक्षतेखाली तालुका वृत्तपत्र विक्रेत्याची बैठक बोत्रे कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाली. यावेळी गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तपत्र विक्री बंदचा इशारा देण्यात आला. ऊन, वारा, पाऊस याची काळजी न करता वृत्तपत्र विक्रेता गेली अनेक वर्षे झाले घरोघरी फिरून पेपर वाटप करतात व कोरोनाच्या काळापासून विक्रेते अडचणीत आले आहेत तसेच त्यांनी अनेक वर्षे झाले ३०% कमिशन द्या याबाबत पत्रे वृत्तपत्रे कंपनीकडे दिले आहेत परंतु याकडे अद्याप लक्ष दिले नाही.
त्यामुळे व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत बरेच वृत्तपत्र विक्रेते आहेत, व याबाबतची मागणी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने ही केली आहे व त्याची दखल न घेतल्यास येत्या ३० मार्च रोजी सांगोला तालुका वृत्तपत्र विक्री बंद करण्याचा इशारा सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी जे पेपर ३०% कमिशन देतील याचा विचार करावा असे मत संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे व सचिव उत्तम काका चौगुले यांनी मत व्यक्त केले.