आटपाडी तालुक्यातील मापटेमळ्यात अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आटपाडी तालुक्यातील मापटेमळा येथील अल्पवयीन मुलगा समर्थ बारा वर्षाच्या अरुण डोके यांने मध्यरात्री पाण्याच्या टाकी मागे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात डॉ. एन.व्ही. कांरडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत माहिती अशी की, मापटेमळात ग्रामपंचायत येथील पाण्याच्या टाकीच्या मागे समर्थ अरुण डोके याने मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या गेली होती. सकाळी शेजारी राहणारे व्यक्तीना ही बाब निदर्शलास आली.

त्यावेळी त्यांनी समर्थ डोके यांला तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केली. पण तो तपूर्वी मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, याबाबत आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचमाना केला आहे. समर्थ डोके यांच्या आत्महत्यांचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना दि. २५ मार्च रोजी मध्यरात्री झाल्यांची प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत अधिक माहिती पोलिस घेत आहे.