तुमची मुलंसुद्धा फोन पाहिल्याशिवाय जेवत नाही, ‘या’ सोप्या पद्धतीने ही सवय सोडा

आजकाल इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत, विशेषतः मोबाईल फोनचा वापर हा प्रौढांपासून ते मुलांपर्यंत सर्व वयोगटातील लोकं करतात. मुलांना अनेकदा त्यांच्या पालकांना पाहून मोबाईल फोन वापरण्याची सवय लागते. पण मुलांनी अभ्यासासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी मोबाईल वापरणे ठीक आहे, पण आजकाल लहान मुलं ही मोबाईल पाहत जेवण करण्याची सवय खूप सामान्य होत चालली आहे. बऱ्याच वेळा पालक आपल्या मुलांना लवकर आणि आरामात खायला घालण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनवर कार्टून व्हिडिओ दाखवतात.

मोबाईलकडे बघत जेवणे ही चांगली सवय नाही, ज्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. पण आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण मुलाची ही सवय सोडू शकत नाही. पण ही सवय सोडणे महत्वाचे आहे, ज्यासाठी या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.

मुलांना उदाहरणे द्या

मुलांसाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या या सवयी सुधारा. जर तुम्हाला तुमच्या मुलाला जेवताना मोबाईल वापरू नका असे समजावून सांगायचे असेल, तर तुम्ही त्यावेळी स्वत: मोबाईल वापरू नये. जर मुलांनी तुम्हाला जेवताना मोबाईल वापरताना पाहिले तर ते देखील तुमच्या या सवयीचे पालन करतील.

कुटुंबासोबत जेवण करा

आजकाल धावपळीमुळे लोकांना कुटुंबासोबत जेवायला क्वचितच वेळ मिळतो. पण जर तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा तरी तुमच्या कुटुंबासोबत बसून जेवत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गॅझेट्सची गरज भासणार नाही. यामुळे मुलाचे लक्ष मोबाईलवरून अन्नाकडे वळेल.

हळूहळू स्क्रीन टाइम कमी करा

जर तुमचे मूल फोन जास्त वापरत असेल तर त्याचा स्क्रीन टाइम कमी करा. जेणेकरून भविष्यात पालक आणि मुलांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. तुम्ही तुमच्या मुलाला जेवण्याची एक निश्चित वेळ ठरवावी आणि या काळात त्याला मोबाईल फोन देऊ नये असा नियम बनवावा. जेवताना मोबाईल पाहिल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल मुलांना सांगा.

जेवण बनवा

एका अशी सुंदर प्लेटमध्ये मुलांचे जेवण द्या. मुलांसाठी हेल्‍दी आणि चविष्ट घरगुती अन्न तयार करा, जेणेकरून मुलांना ते अन्न चविष्ट वाटेल आणि त्यांचे संपूर्ण लक्ष खाण्यावर राहील. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या लहान मुलांना आवडतील असे प्लेट्स उपलब्ध आहेत. तुम्ही मुलाला त्याच्या वयानुसार एक प्लेट देऊ शकता, जी त्याला आकर्षक वाटेल. त्यामुळे मुलांच लक्ष मोबाईलवरून दुर होईल.