उद्या महिलांसाठी विट्यात मोफत कर्करोग तपासणी शिबिर

अनेक सर्वसामान्य जनतेला दवाखान्याचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक गावागावात अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. तर विटा येथे रोटरी क्लबच्या वतीने शनिवार दि. ८ जून रोजी महिलांसाठी मोफत कर्करोग निदान व मेमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम जैन, सचिव अमृतराव निंबाळकर व जनसंपर्क प्रमुख किरण तारळेकर यांनी दिली. तारळेकर म्हणाले, मेमोग्राफी तपासणीचा खर्च मोठा आहे.

परिणामी सर्वसामान्य व गरीब महिलांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे स्तनांच्या कर्करोगाची तपासणी मेमोग्राफीने पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. या शिबिरासाठी सांगली रोटरी क्लबच्या मिडटाऊनचे व नगरपरिषदेचे सहकार्य मिळणार आहे. महिलांनी या मोफत कर्करोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विक्रम जैन, किरण तारळेकर, अमरसिंह निंबाळकर यांनी केले आहे…