हातकणंगले तालुक्यातील अलाटवाडी येथे स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा

अलाटवाडी येथील भक्त मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी अक्षय पोवार व पूजा पोवार या दाम्पत्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर अभिषेक पोवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रात्री १० वाजता इंगळी येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. संदीप चौगुले, जिनेंद्र देसाई, सुभाष भोसले, योगेश माने, रेखा पोवार आदींनी विविध संत चरित्रावरील अभंग, प्रबोधनपर गीते, सामाजिक विषयावरील गीते यासह बहारदार गौळणी सादर करुन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या सर्व कलाकारांना भगवान बावडेकर यांनी (हार्मोनियम), अनिल जावीर यांनी (ढोलकी) तर युवराज लोहार, धनंजय पाटील, जोतिराम नागराळे यांनी (टाळ) साथसंगत केली. अतुल पोवार यांच्यावतीने महाप्रसादाचे वितरण करुन उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी शाहीर संभाजी माने, बंडू आंबी, आक्काताई जाधव, आनंदी शिंदे, कविता जाधव, आनंदी माने, सुशिला जाधव, वंदना शिंदे, सरिता जाधव, दिपाली चव्हाण, चंदाबाई जाधव, आण्णूबाई कदम, रंजना जाधव यांच्यासह अन्य मान्यवर व भाविक उपस्थित होते.