अनेक भागात पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळाला योग्य पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर देखील उमटत आहे. सध्या हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावात पाण्याची समस्या भेडसावत आहे. रेंदाळ गावांमध्ये गळतीची समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न न केल्यामुळे पाणी टंचाईचे भिषण संकट निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बंडामुळे दोन दिवस पाणी पुरवठा झाला नाही. तर लिकेजमुळे शेतात पाणी साठल्याने एका शेतकऱ्याने जॅकवेलच्या फिजा काढून घेतल्यावर हा लिकेज काढण्याच्या उद्योग सुरू असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रेंदाळात वारंवार गळतीमुळे गेली दहा दिवस नळाला पाणी आले नाही. यामुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
गळतीमुळे लाखो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याबरोबरच लाखांचा खुर्दा लिकेज काढण्यात वाया जात आहे. या खर्चाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अंतर्गत वादातून पाणी प्रश्न कोण सोडणार यातून वाद निर्माण झाला होता यातून दोन दिवस पाणी पुरवठा खोळंबला होता याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी देणे गरजेचे आहे.
एका शेतकऱ्याने वारंवार विनविण्या करुनही शेतातील पाणी गळती न काढल्याने नुकसान असह्य होऊन संताप शेतकऱ्यांने फिजा काढून विद्यूत पुरवठा खंडीत केला यामुळे झोपेतून जागे झालेल्या ग्रामसेवकांनी व ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी लिकेज काढण्याचे काम हाती घेतले. रेंदाळ गावाबरोबर हुपरी शहरातील लिकेज काढण्याचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा बंद होता.