हातकणंगले तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून वळीव पावसाने हुलकावणी दिल्यामुळे उष्मा प्रचंड वाढलेला आहे. सकाळी उन दुपारनंतर ढगाळ वातावरण तसेच सायंकाळी विजांचा कडकडाट झाला आणि सोसाट्याचा वारा असे वातावरण असताना ही पावसाचा थेंबही जमिनीवर पडला नाही. त्यामुळे परिसरात पावसाची प्रतिक्षा आहे. तसेच पाऊसने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी आता पुन्हा चिंतेत पडला आहे.
हातकणंगले तालुक्यामध्ये वळीव पावसाची हुलकावणी
