सध्या पूर परिस्थितीमुळे अनेक मार्ग बंद करण्यात आलेले आहेत कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी स्थलांतर केले आहे. त्याच प्रमाणे अनेक रोड देखील बंद आहेत त्यामुळे पर्यायी मार्ग बंद झाल्याने सांगली कोल्हापूर रोडवर प्रचंड वाहतूक वाढलेली पाहायला मिळत आहे. पुणे मुंबई, इचलकरंजी, सांगली मिरजेकडे जाणारी अवजड वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सांगली कोल्हापूर रोडवर वाहनांची मोठी गर्दी झाल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे.
त्यातच चप्पल, फळे, किरकोळ भाजीपाला, कपड्यांचे स्टॉल रस्त्याच्या कडेला लावून बिनधास्तपणे व्यवसाय सुरू आहे त्यामुळे या विक्रेत्यांकडे खरेदी करण्यासाठी चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रागा लागलेल्या पहावयास आपल्याला मिळत आहेत.
हातकणंगले बसस्थानक ते मानाचा फाकड्या पुलापर्यंत सायंकाळच्या वेळी तासंनतास वाहने थांबवावी लागत आहेत या प्रकारामुळे लांबचा प्रवास करणारे वाहनधारक वैतागून गेलेले आहेत. या गंभीर प्रकाराकडे हातकणंगले पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.