हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील श्री १००८ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, सकल दिगंबर जैन समाज, पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव समिती, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर व शिखरस्थ पार्श्वनाथ भगवान मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थंकर आदिनाथ द्वादश वर्षानिमित्त उद्या बुधवार ता. १८ ते सोमवार ता. २३ डिसेंबरअखेर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
३४ वर्षांनी होणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील जैन धर्मियांच्या 18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पंचकल्याण महामहोत्सवाची युद्ध पातळीवर तयारी सुरू झालेली आहे. येथील १००८ भगवान आदिनाथ दिगंबर मंदिरापासून गावातील सर्वच भागांमध्ये सुविचारांचे रंगकाम फलक केले जात आहेत.
मठ परिसरात असणाऱ्या वळीवडे, पाटील, पिराई यांच्या शेतामध्ये या भव्य अशा पंचकल्याण महामहोत्सवाच्या पूजा मंडपाच्या उभारणीचे काम सुरू असून पूजा मंडप, जेवण विभाग मंडप, पार्किंग व्यवस्था, खाद्यपदार्थ स्टॉल, पुस्तक स्टॉल अशा प्रकारे मंडप व्यवस्था केली जात आहे. ३४ वर्षांनी होणाऱ्या या महामहोत्सवाची पट्टणकोडोलीसह परिसरात उत्सुकता लागली आहे.
