जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष– आज धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हा. नफा मिळविण्यासाठी कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नका. अनुभव वाढल्याने कामाचा दर्जा वाढेल. व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळू शकते. विद्यार्थ्याला परीक्षेत जास्त मेहनत करावी लागेल. तरुणांनी त्यांच्या चुकांमधून चांगली शिकवण मिळेल. पोटाची काळजी घ्या, तळलेले पदार्थ खाणे टाळा. कुटुंबाला वेळ द्या, त्यांच्या भावना समजून घ्या. मोठ्या भावाचे मार्गदर्शन लाभेल.
वृषभ – आज समाजामध्ये ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्या लोकांना काम पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचे पूर्ण सहकार्य घ्यावे लागेल. जर व्यवसायात बंद पडला असेल तर आता तो पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे.आरोग्याची काळजी करू नका, तुमच्यात रोगांशी लढण्याची पूर्ण क्षमता आहे. पण काही नियमांचे पालन करा. कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवा.
मिथुन – आज कोणाचेही वाईट करू नका, कारण नकारात्मक ग्रह विनाकारण कोणत्याही कटामध्ये अडकू शकतात. ऑफिशियल कामे रीतसर पद्धतीनं करा. कामाची काळजी करण्याची गरज नाही. व्यापाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करावा. परदेशात जाण्यासाठी तयारी करत असलेल्या तरुणांनी पेपर वर्क तयार करावे. आरोग्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांना आनंदी ठेवायचे आहे. तुमच्या प्रियजनांपैकी कोणी जर करियर किंवा शिक्षण घेण्यास इच्छुक असतील तर त्यांना मदत करा.
कर्क– आज तुमच्या चांगल्या कार्यामुळे लोक तुमचे कौतुक करतील. करिअरशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील, तसेच रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या प्रतिक्रियांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, शक्य असल्यास ग्राहकाच्या आवडीचे उत्पादन विक्रीसाठी ठेवावे. विद्यार्थांनी आज अभ्यासक्रमाकडे लक्ष द्यावे. तरुणांना करिअरचे चांगले पर्याय मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने अॅसिड संबंधित आजारांपासून सावध रहा. कायदेशीर बाबीपासून दूर राहा.
सिंह राशी– आज मनामध्ये आनंद वाढेल, त्यामुळे न झालेली कामे पूर्ण होऊ शकतात. पैसे उधार देण्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. ऑफिसमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधला जाईल. व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल आणि दैनंदिन उत्पन्नही वाढेल.कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. विद्यार्थांची अभ्यासात आवड निर्माण होईल आणि त्यांना परीक्षेतही यश मिळेल. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते. घरामधील नियम पाळा, नाहीतर पालक नाराज होऊ शकतात.
कन्या – समाजात आणि आजूबाजूच्या घडत असलेल्या घटनांकडे लक्ष द्या, अपडेट ठेवा. ज्यांचे करिअर ट्रेझरीशी संबंधित आहे त्यांनी करिअरकडे विशेष लक्ष द्या. सॉफ्टवेअरशी संबंधित लोकांना कामातील चुंकांवर लक्ष केंद्रित करावे. जे लोक फॅशन डिझायनिंगशी संबंधित काम करतात, त्यांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. आरोग्याच्याबाबतीत अग्नीशी संबंधित काम करताना सावध राहाणे आवश्यक आहे, कारण नकारात्मक ग्रह त्रास देऊ शतात.
तुळ राशी – आज इतरांशी वाद घालणे टाळावे लागेल,अन्यथा तुम्हाला अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. जनसंपर्काशी संबंधित लोकांनी कामामध्ये सक्रिय राहावे. अधिकृत कामात सतर्क राहा अन्यथा महत्त्वाची माहिती चुकू शकते. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. पोटात जळजळ होणे आणि पोट दुखणे या समस्या जाणवू शकतात. तिखट-मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
वृश्चिक – महत्त्वाच्या कामात विलंब होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित लोकांना इतरांना मदत करण्यास तयार राहावे लागेल. लाकडाचा व्यापार करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. डॉक्टरांनी कोणत्याही आजारामुळे वजन कमी करण्याचा सल्ला दिला असेल तर त्याबद्दल गांभीर्याने विचार करा. आज काही तरी स्पेशल डिश तयार करून कुटुंबासोबत जेवण करा.
धनु राशी – आज पुस्तके वाचण्यात वेळ घालवा. कार्यक्षेत्रात तुम्हाला काही मनोरंजक काम करायला मिळेल, तसेच अनुभवी लोक मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग करता येईल. आरोग्यामध्ये हाडांशी संबंधित समस्यांबाबत जागरूक राहा, अन्यथा समस्या वाढू शकतात. मोठ्या भावाकडून किंवा बहिणीकडून पैसे मिळू शकतात. अनावश्याक विषयांबद्दल जास्त चर्चा किंवा विचार करणे टाळा.
मकर– आज जास्त बोलणे किंवा चर्चा करणे टाळा. तरुणांनी चिडून कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. मानेच्या वरच्या भागात समस्या येण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. योगा आणि मेडिटेशनने मानसिक स्थिती निरोगी ठेवा. चतुर्थ श्रेणीच्या वर्गाला गोड खाऊ घाला, त्यांचे आशीर्वाद प्रभावी ठरेल.
कुंभ– आज वर्क-लोडमुळे चिड-चिड होऊ शकते. तसेच कर्तव्य पूर्ण करवे लागतील. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. ऑफिसमध्ये, बॉस आणि उच्च अधिकारी कामाचा आढावा घेऊ शकतात, त्यामुळे चुका करू नका. नोकरीत बदलासाठी आजचा दिवस शुभ आहे.आहारात जंक फूडचा वापर कमी करा, शक्य असल्यास रात्रीचे जेवण वगळा. काही कारणाने कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.
मीन-आजचा दिवस प्लॅनिंग करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. बिघडलेल्या व्यावसायिक परिस्थितीला संयमाने हाताळावे लागेल, ग्राहकांच्या संपर्कात राहावे लागेल. प्रकृती अचानक बिघडू शकते. लहान मुलांना ताप, खोकला आणि सर्दी होण्याची शक्यता असते. तुमच्या पालकांना तुमच्याबद्दल वाईट वाटू शकते.