सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा सगळीकडेच ऐकला, बोलला जात आहे. सर्व स्तरावर कुणबी नोंदी शोधण्याचे काम अगदी काटेकोरपणे केले जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. विट्यात देखील सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. कुणबी नोंदीच्या विषयावरून मराठा कृती समितीने आज प्रशासकीय कार्यालयाला धडक दिली.
यावेळी शंकर नाना मोहिते यांच्यासह मराठा कृती समितीकडून अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.
कुणबी नोंदीच्या शोधाचे काम प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती घेण्यात आली.
तहसील कार्यालयातील माहितीनुसार खानापूर तालुक्यातील 22 गावात तब्बल अकराशे नोंदी सापडल्या आहेत.
त्याशिवाय अन्य प्रशासकीय कार्यालयाच्या शोध मोहिमेत मोठा आकडा सापडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शंकर नाना मोहिते यांनी अधिकाऱ्यांशी आज बैठका घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.